"अलगद स्पर्श करून जाणारी समुद्राची ती एक लाट प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी पाहात होती माझीच वाट!! साठवलेल्या मनात तेव्हा दिसत होती एक साथ राहिले इथे काहीच नाही सांगत राहिली मनाच्या आत!! किनारा उगाच ऐकत राहिला वाऱ्यासवे कसली बात अबोल या क्षणाचे आता वेचू नकोस क्षण उगाच!! सरत्या वेळी एकांत सारा वाटे जरी नकोसा आज उद्या पुन्हा भेटण्याची मना नकोस ठेवू उगाच आस!! काय राहिले काय शोधले मिळे न काही त्या जगात निशब्द सारे खूप बोलले उरले न काही या मनात!! सांग तरी का पुन्हा पुन्हा भेटण्यास यावी ती एक लाट ओलावल्या या मनास बोलण्या पाहात होती माझीच वाट…!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*