"अलगद स्पर्श करून जाणारी
 समुद्राची ती एक लाट
 प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
 पाहात होती माझीच वाट!!

 साठवलेल्या मनात तेव्हा
 दिसत होती एक साथ
 राहिले इथे काहीच नाही
 सांगत राहिली मनाच्या आत!!

 किनारा उगाच ऐकत राहिला
 वाऱ्यासवे कसली बात
 अबोल या क्षणाचे आता
 वेचू नकोस क्षण उगाच!!

 सरत्या वेळी एकांत सारा
 वाटे जरी नकोसा आज
 उद्या पुन्हा भेटण्याची मना
 नकोस ठेवू उगाच आस!!

 काय राहिले काय शोधले
 मिळे न काही त्या जगात
 निशब्द सारे खूप बोलले
 उरले न काही या मनात!!

 सांग तरी का पुन्हा पुन्हा
 भेटण्यास यावी ती एक लाट
 ओलावल्या या मनास बोलण्या
 पाहात होती माझीच वाट…!!"

 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

असे कसे हे !! Love POEM

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय…
Read More

एक आठवण ती!!!

Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.com विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read More

जुन्या पानावरती!!

नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!पुसटश्या त्या सांजवेळी, ओ…
Read More

सांजवेळ

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …
Read More

आई बाबा .. || Aai Baba Marathi Poem!!

आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला…
Read More

पाऊस आठवांचा..!

इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!!…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा