एक तु…  !! Ek Tu

Share This:
"त्या वार्‍यानेही तुला छळावे
 सतत तुझे केस उडावे
 तु त्यास पुन्हा सावरावे
 तरी तो ऐकत नाही ना!!

 बघुन एकदा तुला जावे
 पुन्हा पुन्हा परतुन यावे
 तरी त्या पानांस आज
 करमत नाही ना!!

 सांग सखे फुलास आज तु
 हसले का ते बघ नीट तु
 समोर तु येताच त्याच्या
 ते प्रेमात तर पडले नाही ना!!

 कसे हे घुटमळने फुलपाखराचे
 सतत वेड तुला पाहण्याचे
 तुझ्या जवळ येऊन ते
 काही बोलले तर नाही ना!!

 ही सांजवेळ बघते काय ती
 ही मावळती लाजते का ती
 थांबलेल्या त्या क्षणात आज
 ती तुला साठवत तर नाही ना!!

 तुलाच पाहुन हसताना ती
 तुझ्याच जवळ असताना ती
 माझ्याच मिठीत तुला पाहुन
 ती रात्र झोपली तर नाही ना..!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*