एक तु || EK TU MARATHI KAVITA ||

"कसे सांगु तुला
 माझ्या मनातील तु!!
 या शब्दा सवे सखे
 गीत गातेस तु!!
 
 मी पाहता तुला
 अबोल होतेस तु!!
 मी बोलता तुला
 गोड हसतेस तु!!
 
 त्या सांज वेळी
 जवळ असतेस तु!!
 त्या चांदण्या मध्ये
 मला भेटतेस तु!!

 एकांतात माझ्या 
 सोबत असतेस तु!!
 आठवणीच्या गर्दी मध्ये
 हरवुन मज जातेस तु!!
 
 मनात सतत माझ्या
 गुणगुणते एक तु!!
 या शब्दांन सवे सखे
 गीत गातेस तु!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*