
एक अल्लड नटखट रूप सुंदरी
पाहता क्षणी मनात भरली
शब्दांसवे खूप बोलली
कवितेतूनी भेटू लागलीकधी गंधात त्या दरवळून गेली
कधी फुलांसवे हरवून चालली
कधी त्या स्वप्नी येऊन गेली
कधी अलगद मिठीत विरलीलख्ख त्या चांदण्यात उगा शोधली
पावसाच्या सरीत चिंब भिजलेली
हळुवार ती झुळूक जणू बोलली
प्रेम हे माझे पाहून गेलीनिरागस भाव तिचे टिपू लागली
ओठांवरील हसू तिचे शोधू लागली
कधी कधी उगाच रागावून गेली
कधी कधी उगाच रुसू लागलीवाट तिची कोणती विचारू लागली
वेलीस, पानास , फुलास बोलून गेली
पुन्हा पुन्हा तिथेच येऊ लागली
चेहरा तिचा पाहू लागलीमनास या माझ्या घेऊन गेली
नजरेस या माझ्या ओलावून गेली
शब्दासवे मज खूप बोलली
कवितेत अखेर राहून गेलीएक अल्लड नटखट रूप सुंदरी
कवितेतून मज भेटू लागली..!!✍योगेश