एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read

Share This:
"ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
 मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
 प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी गिनती !!
 रुतेल तो काटा अपयशाचा, पण मन नसेल दुःखी !!

 सांग ओरडुन आहे अजुन, शर्यंत ही कोणती !!
 इथे अजुन!! तूही अडून, जणू पाहणारे पाहाती !!
 ध्येय एक , ध्यास एक, चिकाटी असावी सोबती !!
 सांगेन मार्ग पुन्हा तेव्हा, तुझ्या प्रयत्नांच्या गोष्टी !!

 चालता फक्त चालत राहावे, सोबत नसावी आस ती !
 कधी असेल एकांत असा, कधी असेल सोबतीस ती!!
 सांग त्या मनास समजून, जगणे जणू रित ती !!
 अपयशात रडू एकटे , जिंकता आनंदाच्या भेटी !!

 वाचाळता नसावी ओळख, कृतीतून सारे बोलती !!
 कुठे गर्व उराशी येता, सारे तिथेच संपून जाती !!
 नसावे दोष कोणास काही, न करावी टीका ती !!
 वाईट वेळ येईल तेव्हा, असावी सकारात्मक दुष्टी!!

 हा मार्ग असा की, नसावी परतीची वाट ती!!
 अनोळखी या माणसाची, जणू हीच ओळख ती !!
 येणाऱ्या कोणा हातातील, व्हावी एक मशाल ती !!
 जणू प्रकाश होऊन पसरावे, तोच खरा जिद्दी !!"

 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*