“आज अचानक मला
आठवणीचे तरंग दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसलेदुरावलास तु नकळत
व्यर्थ ते कारण दिसले
कळता मझ चुक ही
किती हे काळ दिसलेआज ही तु अधुरा
मझ मी अधुरी दिसले
अमाप प्रेम हे मनी
आज हे डोळ्यात दिसलेमझ मी न राहीले
तुझेच रूप दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसले!!”
– योगेश खजानदार