एक कळी… !! || EK KALI MARATHI KAVITA ||

Share This
"एकदा वेलीवरची कळी
 उगाच रुसुन बसली!!
 काही केल्या कळेना
 फुगून का ती बसली!!

 बोलत नव्हती कोणाला
 पाना मागे लपुन बसली!!
 हसत नव्हती कशाला
 अबोल होऊन बसली!!

 सांग तरी काय झाले
 का रुसुन बसली!!
 बोलना आता एकदा तरी
 कशासाठी फुगुन बसली!!

 काही केल्या बोलेच ना
 पंचाईतच होऊन बसली!!
 कशी उमलेल ही कळी
 चिंताच होऊन बसली!!

 पाने , कळ्या , वेलीवरची
 सगळे मनवुन बसली!!
 काही केल्या हसेच ना
 उगाच रडत बसली!!

 वेलीवरची ती कळी
 एकटीच जाऊन बसली
 पण काही केल्या कळेना
 रुसुन का ती बसली … !!"
 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

जगणे..!! JAGANE KAVITA MARATHI ||

Tue Jan 10 , 2017
कधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं