एक आठवण ती || AATHVAN MARATHI POEM ||

 विसरून जावी , पण ओठांवर आहे !!
पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!!
एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!
तुझ्या असण्याची, जाणीव एक आहे !!

 सांगावी तुला ती, पण निशब्द मी आहे !!
तुझ्या सोबतीची, उगा ओढ आहे !!
भेटावी कधी अचानक, मना वाटतं आहे!!
परी आभास का , आज होत आहे !!

 साऱ्या चांदण्यात आज, तूला शोधले आहे!!
पण ती चांदणी एक, कुठे हरवली आहे ?
चंद्र तो त्याविन, अधुरा भासतो आहे!!
चांदणे ते पौर्णिमेचे, तुला बोलते आहे !!

 पहावी ती सांज, झुळूक एक आहे !!
बोलते ते ती काही, मन हे ऐकते आहे!!
हात हातात घेऊनी, वचन देत आहे !!
आयुष्यभराची सोबत, एवढेच मागणे आहे !!

 नजरेत भरुनी घ्यावे, तुझेच चित्र आहे !!
अश्रू हे ओघळता, नजरेस हरकत आहे !!
समजवावे कोणास , हाच प्रश्न आहे!!
मन हे अल्लड, मी अधीर आहे !!

 सारी पाने पहावी, तुझेच नाव आहे!!
कवितेत त्या लिहिताना, भाव तूच आहे !!
शब्दांच्या पलीकडे पाहता, गाव तेच आहे !!
जिथे तुझे नी माझे , घर एक आहे !!!

 एक आठवण ती, तुझी सोबत आहे !!!
 ✍️©योगेश खजानदार 

READ MORE

गीत || GEET || KAVITA || LOVE ||

गीत ते गुणगुणावे त्यात तु मझ का दिसे शब्द हे असे तयाचे मनात माझ्या बोलते असे तु राहावी जवळ तेव्हा…

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना…

तो पाऊस || PAUS MARATHI KAVITA ||

"तो पाऊस आणि ती खिडकी मला खूप काही बोलतात आठवणींच्या कित्येक थेंबात मला चिंब भिजवून जातात कधी अगदी मनसोक्त बरसून…

पाऊस आठवांचा || POEM IN MARATHI ||

इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!!

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय…

Next Post

जागतिक रंगमंच दिन || 27 MARCH ||

Fri Mar 27 , 2020
“२७ मार्च हा दिवस दर वर्षी संपूर्ण जगामध्ये जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवसाचे सर्वात प्रथम १९६२ मध्ये International Theatre institute यांनी आयोजन केले. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे नाटक, कला या रंगभूमीशी निगडित गोष्टींना जागतिक […]