एकांत || EKANT KAVITA MARATHI ||

"का छळतो हा एकांत
 मनातील वादळास!!
 भितींवरती लटकलेल्या
 आठवणीतल्या चित्रात!!
 बोलतही नाही शब्द
 खुप काही सांगते
 ऐकतही नाही काही
 सगळं मात्र बोलते!!
 भिंतीही हसतात
 छप्पर ही साथ सोडतेय
 एकांतातल्या मला!!
 घर ही नको म्हणतेय!!
 मी जाऊ तरी कुठे??
 आपलस कोण म्हणतेय!!
 मी बोलवु कोणाल??
 माझ कोण दिसते!!
 का छळतो हा एकांत??
 एकटा मी जगतोय!!
 भितींवरती लटकलेल्या
 आठवणीतल्या चित्रात!!"
 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

मराठी भाषा दिवस || MARATHI BHASHA DIVAS ||

Sat Feb 27 , 2016
एकच गर्व मनात मी मराठी असल्याचा!! एकच भाव मनी मराठी बोलण्याचा!! पावन भुमी आमची इतिहास शिवरायांचा!!