एकांतात ही || EKANT KAVITA MARATHI ||

Share This
"एकांतात बसुनही कधी
  एकट अस वाटतंच नाही!!
  घरातल्या भिंतींही तेव्हा
  बोल्या वाचुन राहत नाही!!

 तु एकटाच राहिलास इथे
  सोबत तुझ्या कोणीच नाही!!
  आयुष्यभर दुसर्‍यासाठी जगुन
  हाती तुझ्या काहीच नाही!!

 मागुन तरी काय मागितलंस
  दोन क्षण बाकी काही नाही!!
  तेवढ देण्यासाठी ही तुला
  आपल्या लोकांकडे वेळच नाही!!

 बघ एकदा आमच्याकडे
  आज ही आम्ही वेगळया नाही!!
  ऊन पावसाच्या खेळां मध्ये
  नातं आमच तुटलं नाही!!

 खरंच सांगतो तुला
  बरंच झालं आम्ही माणुस नाही!!
  सहज नातं तोडायची
  आमच्यात खरंच ताकद नाही!!

 एकांत तुझा आम्हाला
  आता पाहावतं नाही!!
  घराशी जोडलेल नातं तुझं
  आम्ही कधीच विसरू शकत नाही!!

 म्हणुनच एकांतात बसूनही कधी
  एकटं अस वाटतंच नाही!!"
 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RSERVED*

READ MORE

सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …
Read More

Next Post

बार्शी आणि || BARSHI AANI || MARATHI ESSAY ||

Sat Dec 3 , 2016
मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी चार ओळीत उत्तर द्या या प्रश्नाला देखील आमचे बार्शीतले विद्यार्थी पुरवणी मागितल्या शिवाय राहणार नाहीत. एकंदरीतच काय तर आमच्या बार्शीकरांना बोलण्याची प्रचंड हौस.