"एकांतात बसुनही कधी एकट अस वाटतंच नाही!! घरातल्या भिंतींही तेव्हा बोलल्या वाचुन राहत नाही!! तु एकटाच राहिलास इथे सोबत तुझ्या कोणीच नाही!! आयुष्यभर दुसर्यासाठी जगुन हाती तुझ्या काहीच नाही!! मागुन तरी काय मागितलंस दोन क्षण बाकी काही नाही!! तेवढ देण्यासाठी ही तुला आपल्या लोकांकडे वेळच नाही!! बघ एकदा आमच्याकडे आज ही आम्ही वेगळया नाही!! ऊन पावसाच्या खेळां मध्ये नातं आमच तुटलं नाही!! खरंच सांगतो तुला बरंच झालं आम्ही माणुस नाही!! सहज नातं तोडायची आमच्यात खरंच ताकद नाही!! एकांत तुझा आम्हाला आता पाहावतं नाही!! घराशी जोडलेल नातं तुझं आम्ही कधीच विसरू शकत नाही!! म्हणुनच एकांतात बसूनही कधी एकटं अस वाटतंच नाही!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RSERVED*
