एकदा तु सांग ना || EKADA TU SANG NA ||

आज जागतिक कन्या दिनानिमित्त ही कविता ..एक मुलगी आपल्या आईस बोलते ..!!

 या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना
 मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना!!
 ती पावलं माझी घरभर फिरतील 
 मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना !!

 बाबा म्हणणारी ती त्याच्यावर मनसोक्त जीव लावणारी ती
 तुझ्यातील एक मी तु हरवतेस का सांग ना!!
 तूही एक स्त्रीच आहेसं मग एका स्त्रित्वाला
 प्रत्येक वेळी हरताना पहायचंय का सांग ना!!

 हीच खुडणारी हाते लक्ष्मी देखील म्हणतात मला
 दुर्गा म्हणून उगाच पूजतात का सांग ना!!
 त्याचं देवीचा गळा घोटून त्याचं हाताने मग
 कोणती लक्ष्मी पूजनार आहेस सांग ना!!

 बरं पण गुन्हा काय माझा तो तरी सांग ना
 मुलगी झाले हाच गुन्हा का माझा!!
 जन्मास येताना दोन घराचं नात जोडताना
 अधिकारच काय यांचा माझ्या पावलांना खुडायचा, तो तरी सांग ना!!

 नात्यांमध्ये येताना कित्येक रूप आहेत माझी सांग ना!!
 मी आई आहे,मी बहीण आहे , मी बायको ही आहे!!
 मी प्रेम आहे , मी माया आहे , मी आठवण ही आहे!!
 मग माझा सगळे तिरस्कारच का करतात सांग ना!!

 माझ्या सोबत राहून तु माझी साथ देशील का सांग ना!!
 माझ्या स्वप्नांना आता पंख देशील का सांग ना!!
 तुझ्यातील मी एक स्त्री जणु हाक देत आहे तुला!!
 मला आता मनसोक्तपणे बहरू देणार आहेस का सांग ना!!

 -योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *