"धुंद हे सांज वारे छळते तुला का सांग ना? का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना!! डोळ्यात हे भाव जणु विरह हा तो कोणता?? भावनेस शब्द दे एकदा तु सांग ना!! मावळतीस सुर्य तो अंधार मनी का दाटला?? का घुसमट ही मनाची एकदा तु सांग ना!! बोलते हे सांज वारे दुरच्या आपुल्या कुणा?? ओढ ती का अनावर एकदा तु सांग ना!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
एकदा तु सांग ना || DHUND HE SANJ VAARE || SANJ KAVITA |
