Contents
"न उरल्या कोणत्या भावना शेवट असाच होणार होता!! वादळास मार्ग तो कोणता त्यास विरोध कोणता होता!! राहिल्या तुटक्या काहीं आठवणी त्यास आधार काहीच नव्हता!! पापण्यात साठवून ठेवण्यास कोणताच अर्थ उरला नव्हता!! काही शिल्लक ते मनात आहे तोच सारा आधार होता!! सांगू तरी कोणास आता आपुल्यांचा चेहरा हरवला होता!! माझ्यातील तो आज का कित्येक प्रश्न विचारत होता!! वादळात साथ सोडली त्यास कोणता दोष देत होता!! उध्वस्त हे नात्यातील मज का कित्येक चेहरे दाखवत होता!! खऱ्या खोट्या वचनास मग तो क्षणात नाहीसे करत होता!! एकांतात उरल्या मला का आपुलासा करत होता उरल्याच न कोणत्या भावना मग,शेवट असाच होणार होता …!" ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत…
Read Moreठरवुन अस काही होतंच नाही
मनातलेच मन कधी ऐकत नाही
नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला
रोजच भेटल्या शिवा…
Read Moreतुटलेल्या मनाला आता
दगडाची अभेद्यता असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी
शब्द आ…
Read Moreतुझी आठवण यावी
अस कधीच झालंच नाही
तुला विसरावं म्हटलं
पण विसरता ही येत नाही
कधी स्वतःला विचारलं …
Read Moreएक दिवस असेल तो
मला पुन्हा जगण्याचा
लहानपणीच्या आठवणीत
पुन्हा एकदा रमण्याचा
शाळेतल्या बाकड्यावर
…
Read Moreक्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं
विचार एकदा मनाला
…
Read Moreवाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!
सांग काय…
Read Moreशोधुनही सापडेना एक वाट ती
हरवली सांज हरवली रात्र ती
नभी एक चांदणी पाहते कुणा ती
मझ सांगते पहा सोबतीस…
Read More