"न उरल्या कोणत्या भावना
शेवट असाच होणार होता!!
वादळास मार्ग तो कोणता
त्यास विरोध कोणता होता!!
राहिल्या तुटक्या काहीं आठवणी
त्यास आधार काहीच नव्हता!!
पापण्यात साठवून ठेवण्यास
कोणताच अर्थ उरला नव्हता!!
काही शिल्लक ते मनात आहे
तोच सारा आधार होता!!
सांगू तरी कोणास आता
आपुल्यांचा चेहरा हरवला होता!!
माझ्यातील तो आज का
कित्येक प्रश्न विचारत होता!!
वादळात साथ सोडली त्यास
कोणता दोष देत होता!!
उध्वस्त हे नात्यातील मज का
कित्येक चेहरे दाखवत होता!!
खऱ्या खोट्या वचनास मग तो
क्षणात नाहीसे करत होता!!
एकांतात उरल्या मला का
आपुलासा करत होता
उरल्याच न कोणत्या भावना
मग,शेवट असाच होणार होता …!"
✍️© योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*