"उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या
  कैक मुडदे आजही निपचित आहेत!!

 उगाच ऐकले आवाज ते सत्याचे
  आजही ते दगड निर्जीव पडून आहेत!!

 नाही भ्रांत त्यास कशाची आता
  आभास त्यास कशाचे होत आहेत!!

 कसली ही आग पेटली त्या मनात
  कित्येक स्मशान आज जळत आहेत!!

 हो , उठाव केला आहे मनाने मनाचा
  कैक वादळे शांत झाली आहेत!!

 उद्ध्वस्त घरात आजही कोणी का
  आपुल्यास पाहून आवाज देत आहेत!!

 कित्येक अपमान सहन केले त्याने
  तरीही निर्लज्ज होऊन हसत आहेत!!

 छाताडावर पाय ठेवून बोलता ते
  कैक अहंकार जाळून टाकत आहेत!!

 कोणता हा बंड केला निरर्थक आज
  कित्येक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत!!"

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE