FavoriteLoadingAdd to favorites
 आशिर्वाद द्यावा , तू आज गजानना!!
 परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला!!

 तुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा!!
 विरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा !!

 विघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा!!
 तुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा!!

 चूकभूल न उरावी , हेच मागणे नंदना!!
 गोडी त्या मोदकाची , रेंगाळुदे आता सदा !!

 राग ,द्वेष, मत्सर, घेऊन जा तू तुझ्यासवे जरा !!
 सुख, समृद्धी आणि आरोग्य , नांदू दे इथे सदा !!

 ऐक तू माझे, लंबकर्णा , पितांबरा!!
 एकदंत तू , धूम्रवर्ण तू , तुझ्याविना न कोण विश्र्वमुखा  !! 

 परतुनी पुन्हा येण्या , वचन दे तू मला!!
 डोळ्यात आहे पाणी , आठवणीत आहेस तू सदा !!

 आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !!

 ✍️ ©योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक आठवण ती!!!

Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.com विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read More

जुन्या पानावरती!!

नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!पुसटश्या त्या सांजवेळी, ओ…
Read More

1 thought on “आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM ||”

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा