"आवाज आता दबुन गेला
  शक्ती आता संपुन गेली!!
 वाईटाच्या मार्गावर अखेर
 माणुसकी ही मरुन गेली!!

 कोणी कोणाला बोलायचं नाही
 अत्याचाराशी लढायचं नाही!!
 निर्दोष लोकं फुकट मेली
 गुन्हेगार इथे सुटुन गेली!!

 पराक्रमाची गोष्ट खरी
 पुस्तकात ती लिहुन गेली!!
 थोर पुरुषांचे पुतळे बांधुन
 जात इथे वाटुन गेली!!

 पैशाची ही दुनिया खरी
 जगास सार्‍या विकुन गेली!!
 विश्वास जणु मोती मनाचा
 कवडी मोल लुटून गेली!!

 राहिले शेवटी काय इथे
 वाट ती भरकटून गेली!!
 वाईटाच्या मार्गावर अखेर
 माणुसकी ही मरुन गेली!!"
 :योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE