"या निर्जीव काठीचा आधार
 मला आता आहेच
 पण तुझ्या हातांचा आधार असावा
 एवढच वाटतं मला!!

 खुप खुप एकांतात असताना
 आठवणींचा खजिना भेटतोच
 पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा
 तेच हवंसं वाटतं मला!!

 कधी विसरुन जाताना मला
 ते वय आठवण करुन देतंच
 पण त्या लहान पावलां सोबत
 पुन्हा खेळावस वाटतं मला!!

 राजा राणीच्या गोष्टींत हरवुन जाताना
 मन थोडं मागे जातंच
 पण ते ऐकणारी ती छोटीशी प्रजा
 खुप पहावीशी वाटते मला!!

 हे वयंच असतं ना असं
 सगळं अंधुक होतं जातंच
 पण पुन्हा ते नव्याने समोर दाखवणारं
 आपलंस कोणी असावं वाटत मला!!

 या श्वासांचा जप अखेर
 कधी ना कधी संपेलच
 पण शेवटच्या श्वावसात सोबत असणारं
 माझं घर जवळ असावं वाटत मला!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE