आठवत तुला?
 तू एकदा भेटायचं म्हटली होतीस!!
 मनातल काही सांगायचं म्हटली होतीस!!
 पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस!!
 आणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस!!

 आठवत तुला??
 त्या वळणावर एकदा मला अचानक भेटली होतीस!!
 नजरेने पाहुन मला खूप काही बोलली होतीस!!
 पुन्हा भेटण्याचं वचन देऊन गेली होतीस!!
 आणि कित्येक आठवणीत मला अडकवून गेली होतीस!!

 कधी आठवेन ना तुला??
 मी समोर नसताना तू हरवून गेली होतीस!!
 मला भेटण्याच्या ओढीने अश्रूशी खूप बोलली होतीस!!
 त्या वेड्या मनाला समजावून सांगत होतीस!!
 आणि माझ्यात उगाच स्वतःला शोधत राहतं होतीस!!

 आठवतन ना तुला??
 माझ्या कित्येक जुन्या पानात फक्त तूच होतीस!!
 कधी शांत सांज तर कधी दुपारचं ऊन होतीस!!
 माझ्या मनातले भाव माझे शब्द होतीस!!
 आणि माझ्या मनातील एक सुंदर कविता होतीस!!

 आठवत तुला..?? 

 -योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE