आठवण || AATHVAN MARATHI KAVITA ||

"धुंध त्या सांजवेळी
 मन सैरभैर फिरत!!
 आठवणींना वाट मिळे
 डोळ्यात दिसत!!
 तु आहेस ही जाणीव
 तु नाहीस हा भास
 मनही हल्ली गंमत करत!!
 तु येशील म्हणून
 वाट पाहत असत!!
 माझच हे मन
 नाव तुझच असत!!
 सांग या वेड्या मना
 जगन असच असत!!
 ओढ आयुष्यभराची
 प्रेम दोन क्षणांच असत!!
 धुंध त्या सांजवेळी
 मन सैरभैर फिरत!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*