“खरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात!!
वाळुवरच्या रेषां सारख्या
सहज पुसता येतात!!

विसरुन जाव म्हटलं
तरी लाटां सारख्या येतात!!
दुर्लक्ष करावे म्हटलं
तरी मन ओले करतात!!

सतत सोबत यांची
गर्दीत ही असतात!!
एकांतात साथ असते
खुप सुंदर वाटतात!!

कधी हळुच लहर येते
मन सुखावून जातात!!
कधी तडाखा लाटेचा
अश्रू देवुन जातात!!

मनाच्या या समुद्रात
आठवणीच असतात!!
भरती आणि ओहोटी
सतत चालू असतात!!

कधी वारे सुखाचे
मनसोक्त आनंद लुटतात!!
दुःखाच्या या वादळात
कित्येक जहाज बुडतात!!

खरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात!!”

-योगेश खजानदार

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा