मी विसरावे ते क्षण
 की पुन्हा समोर आज यावे!!
 सहज आठवणीने तेव्हा
 जुने ते पान उलटावे!!

 का सोबतीस तु
 मला येऊन भेटावे!!
 जुन्या त्या वाटेवरती
 साथ देत आज जावे!!

 कधी ओल्या पापण्या त्या
 अंधुक नजरेस व्हावे!!
 तुझ्या विरहाचे ते
 सारे दुख आज वाहुन जावे!!

 एक सोबत हवी तुझी
 नी हात हातात घ्यावे!!
 प्रेम माझ्या मनातले तेव्हा
 तुझ्या ह्रदयास आज सांगावे!!

 कळेल ना तुला ते माझे मन
 की पुन्हा पुन्हा ते सांगावे!!
 तुझ्या विरहात आज मी
 कीती तुला लिहावे!!

 हे प्रेम नी मन असे की
 तुझेच शब्द का व्हावे!!
 नी सहज आठवणीने तेव्हा
 जुने ते पान उलटावे ..!!

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE