"तुझी आठवण यावी, अस कधीच झालंच नाही!! तुला विसरावं म्हटलं, पण विसरता ही येत नाही!! कधी स्वतःला विचारलं मी, पण मन मला बोललंच नाही!! तुझ्या राज्यातुन ते कधी, परत माझ्याकडे आलंच नाही!! माझेच मला परके व्हावे, इतके शब्द ही ऐकत नाहीत!! माझ्या कविते मधुन ते, तुला बोलणं सोडतं नाहीत!! बेधुंद त्या मनास कधी, सुर ते भेटतं नाही!! तुला भेटावंस वाटल तरी, ती वाट कुठे दिसत नाही!! सांग कसे समजावु मला, मन काही ऐकत नाही!! तुला विसरावं म्हटलं, पण विसरता काही येतं नाही!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*