“इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच
की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची
नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी
की रुतून जावी पाऊले ही मनाची

कधी आठवतो तो चंद्र पोर्णिमेचा लख्ख
की उजाळुन टाकतो घरे ही स्वप्नांची
कधी असतो नुसता अंधार जणु
की न दिसावी आपुली माणसे ही जवळची

डोळ्यातील हे अश्रूंही ओळखतात त्यांना
की कथा काहीसी जुन्या क्षणांची
ओठांवरचं हसु ही शोधत का जणु
ती आनंदाची पर्वणी होती आपुल्यांची

एक एक येते आता पुन्हा पुन्हा का तरी
की व्यापुन टाकते जागा या जीवनाची
एकटे बसुन ही कधी कधी बोलते जणु
की साथ देते माझ्या एकांताची

अखेर केला हिशोब या जगण्याचा जेव्हा
की एक ओढ होती काय मिळाल्याची
मनाच्या पेटीत ओझे होते आठवणींचे
की आयुष्यभर सोबत होती फक्त त्यांची!!”

– योगेश खजानदार

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा