आई || MARATHI KAVITA || AAI ||

Share This

आईबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  अस म्हणतात देवाचं दुसरं रुप म्हणजे आई … आई फक्त तुझ्याचसाठी ….

"आई, खरचं तुझी मला आठवण येते!!

 तु भरवलेल्या घासाची
 तुझ्या प्रेमळ शब्दाची
 तु गोंजारलेल्या हातांची,
 आई, खरचं आठवण येते!!!

 तु कधी रुसत होती
 तु कधी रागवत होतीस
 तुझ्या त्या प्रेमाची
 आई, खरचं आठवण येते!!

 तुच घडवले मला
 तुझेच हे संस्कार
 यशाच्या शिखरावरही
 आई, खरचं तुझी आठवण येते!!

 तुझी माया खरंच कळत नाही
 तुझे रागावणे आणि प्रेम
 यातला फरकंच कळत नाही
 तुझ्या आठवणीने
 क्षणोक्षणी येते भरुन मन
 तुझ्या मायेचे
 कधीच उपकार फेडु शकत नाही!!

 म्हणुनच आई, खरचं तुझी मला खुप आठवण येते …!!!"

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

खंत… || KHANT MARATHI POEM ||

तो दरवाजा उघडला होता तीच्या डोळ्यात पाणी होते आईची खंत काय आहे ते मन आज बोलतं होते नकोस सोडुन जा…
Read More

आपल्यास !! AAPALYAS

या निर्जीव काठीचा आधार मला आता आहेच पण तुझ्या हातांचा आधार असावा एवढच वाटतं मला खुप खुप एकांतात असत…
Read More

बाबा || BABA SUNDAR MARATHI KAVITA

रात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स…
Read More

एकदा || EKDA || LOVE || POEM ||

बघ एकदा माझ्याकडे तो मीच आहे तुझ्या पासुन दुर तो आज ही तुझाच आहे तु विसरली अशील ते मी तिथेच जगत…
Read More

Next Post

प्रेम मला कधी कळलचं नाही || LOVE POEM ||

Mon Sep 29 , 2014
प्रेम मला कधी कळलचं नाही बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही मनातल्या कोपर्‍यात कधी कोण दिसलच नाही म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. . तिचं हसणं कधी पाहिलंच नाही त्याच रहस्य कधी जाणलंच नाही म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही