आईबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  अस म्हणतात देवाचं दुसरं रुप म्हणजे आई … आई फक्त तुझ्याचसाठी ….

"आई, खरचं तुझी मला आठवण येते!!

 तु भरवलेल्या घासाची
 तुझ्या प्रेमळ शब्दाची
 तु गोंजारलेल्या हातांची,
 आई, खरचं आठवण येते!!!

 तु कधी रुसत होती
 तु कधी रागवत होतीस
 तुझ्या त्या प्रेमाची
 आई, खरचं आठवण येते!!

 तुच घडवले मला
 तुझेच हे संस्कार
 यशाच्या शिखरावरही
 आई, खरचं तुझी आठवण येते!!

 तुझी माया खरंच कळत नाही
 तुझे रागावणे आणि प्रेम
 यातला फरकंच कळत नाही
 तुझ्या आठवणीने
 क्षणोक्षणी येते भरुन मन
 तुझ्या मायेचे
 कधीच उपकार फेडु शकत नाही!!

 म्हणुनच आई, खरचं तुझी मला खुप आठवण येते …!!!"

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

आई बाबा .. || Aai Baba Marathi Poem!!

आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला…
Read More

बाबा …👨‍👧‍👦

उसवलेला तो धागा कपड्यांचा कधी मला तू दिसुच दिला नाही मला नेहमीच नवीन कपडे घेतले पण स्वतःसाठी एकही…
Read More

बाबा ..!! Father’s day..

तुमच्या बद्दल लिहिताना कित्येक विचार येतात बाबा आणि प्रत्येक शब्द मला कित्येक भाव सांगतात…
Read More

माझी आई || MAJHI AAI || MARATHI POEM ||

अथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेम नजरेत दिसते आकाश सारे सामावू…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा