आई || मराठी कथा भाग १ || Marathi Story ||

भाग १

” ohh no..!! ” शीतल हातातल्या pregnancy टेस्टिंग kit कडे पाहत म्हणाली. हातातले ते किट तसेच घेऊन ती बाथरूम मधून बाहेर आली. समोर बसलेल्या समीरकडे पाहत म्हणाली.
“जे मला नको होत तेच झालं!! “
समीर हातातले पुस्तक बाजूला ठेवत म्हणाला.
“काय झाल ??”
शीतल थोडी अडखळत म्हणाली.
“I’m pregnant !!”
“What ?? खरंच ?? ” समीरला आपला आनंद लपवताच आला नाही.
“समीर !! आपलं काय ठरलं होत ?? “
समीर जरावेळ शांत राहिला आणि म्हणाला.
“हो पण !! आता आहे ते accept करूयात ना ?”
“नाही समीर !! मला नकोय हे मूल !! “
“म्हणजे ?! ” समीर प्रश्नार्थक मुद्रेने शीतलकडे पाहू लागला.
शीतल काहीच न बोलता जवळ ठेवलेला मोबाईल घेते आणि फोन लावते.

“हॅलो !! डॉक्टर पाठक आहेत का ??”
पलीकडून receptionist बोलते ,
“डॉक्टर साहेब अजून आले नाही !! बारा पर्यंत येतील !! आपण कोण ??”
” मी मिसेस शीतल दीक्षित !! मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची होती !!”
“Ok !! डॉक्टर तुम्हाला ४ नंतर भेटतील !!!”
“ठीक आहे !! मी येईल ४ नंतर !! “

शीतल डॉक्टर पाठक सोबत अपॉइंटमेंट फिक्स करते हे सगळं करताना समीर शांत राहून सगळं पाहत होता.
न राहून तो शीतलला विचारतो,
“डॉ पाठक ??”
“हो !! ४ नंतर भेटणार आहेत ते !! “
“हो पण कशासाठी ??”
“मी abortion करायचं ठरवलंय समीर !! “
समीर खुर्चीवरून पटकन उठत शीतल जवळ गेला.
“शीतल abortion ??”
“हो !!”
“आणि हा निर्णय तू एकट्याने घेतलास ?? आई बाबा , मी तुझे आई बाबा यांचा एक क्षणही तुझ्या मनात विचार आला नाही.
“नाही समीर !! मी तुला लग्नाआधीच सांगितलं होत मला मुल जन्माला घालायचं नाहीये म्हणून !! आणि तू त्यावेळी हो पण म्हणाला होतास !!आठव !!”
” हो म्हणालो होतो मी !! पण मला त्यावेळी वाटलं !! पुढे संसारात तुझं मन लागलं की तू ते सगळं विसरून जाशील !! आपल्या प्रेमात तुला आपलं बाळही हवंहवंसं वाटेल !! “
” नाही समीर !! ते शक्य नाही !! मला मुल नको आहे !! आणि मी त्यावर ठाम आहे !!
” पुन्हा एकदा विचार कर शीतल !!” समीर हतबल होऊन म्हणाला.
“नाही समीर माझा निर्णय बदलणार नाही !! “
“ठीक आहे !! “

समीर निराश होऊन खोलीतून बाहेर आला. समीरची आई त्याला काही बोलणार तेवढ्यात समीर बाईकची चावी घेऊन बाहेर पडला. त्याच्या मागे शितलही खोलीतून बाहेर आली तिला पाहून आईने विचारलं,

“काय झालं ग !! समीर एवढा घाईघाईत बाहेर पडला !!”
“काही नाही आई!! त्याला काम होत म्हणून जरा घाईघाईत बाहेर गेला!!”
“नक्की ना ?? का भाडलात तर नाहीत ना ??”
” नाही आई !! असं काहीच नाही !!”

आईच्या नजरेतून शीतल आणि समीरच वागणं काही केल्या सुटलं नाही. काहीतरी चुकलय हे तिला कळलं होत.

समीर वेड्यासारखं भरधाव गाडीवर रस्ता दिसेल तिकडे जात होता मनात त्याच्या प्रचंड विचारांचा कल्लोळ माजला होता.
“मी बाप होणार आहे हे ऐकल्यावर समोरचा माणूस किती आनंदून जातो ना ?? मग तो आनंद मला होऊनही त्याच्या मागे हे वेगळंच संकट का यावं ?? शीतल आणि मी आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टींवर भांडलो नाहीत. मला तिच्या कर्तृत्वाचा , तिच्या वागण्याचा हेवा वाटतो पण आता तोच हेवा नकोस का वाटावा ?? मी बाप होणार आहे !! याहीपेक्षा ती आई होणार आहे याचा आनंद तिला सर्वात जास्त व्हायला हवा ना ?? मग एक स्त्री असूनही ती एवढी कठोर का व्हावी !! शीतल नक्की काय करतेय हे तिलाच कळत नाहीये !! आज किती आनंदाचा दिवस !! आमचं लग्न झालं त्यानंतर संसाराचा हा दुसरा भाग सुरू व्हावा !! पण शीतल त्याला सुरू होण्या आधीच का बंद करते आहे !! काहीच कळत नाही !! ” समीर अचानक भानावर आला.
समोर अचानक आलेल्या व्यक्तीकडे पाहून त्याने जोरात गाडी थांबवली.

“मी आयुष्यात कधीच आई होणार नाही हे सांगूनही समीरच हे वागणं मला काहीच केल्या कळतं नाही !! अरे नको आहे मला ते सर्व काही !! Typical बाईपण !! कशासाठी करू मी सर्व !! एवढी काळजी घेऊनही शेवटी जे नको होत तेच झालं. एकदा डॉक्टर पाठक यांच्याशी भेटले की सगळं काही ठीक होईल !! घरातल्या कोणाला कळायच्या आत यातून मी बाहेर पडावे एवढीच इच्छा !! समीरला काय मी कशीही मनवेल पुन्हा !! तो काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही !! शीतल आवरत आवरत मनात विचार करत होती. सतत घड्याळाकडे पाहत होती.
” असा कसा वागू शकतो समीर !! लग्नाच्या आधी त्याने कबूल केलं होत ना हे !! मग आता का तो असं करतोय !! माझ्या निर्णयाला त्याने उलट पाठिंबा द्यायला हवा होता. पण नाही !! त्याच आपलं वेगळंच चालू आहे !! येऊतरी दे त्याला घरी चांगली बोलणार आहे त्याला !! “

घड्याळात चारचे ठोके वाजले, शीतल आवरून बाहेर पडली जाताना आईला काहीच न सांगता निघून गेली. तिला केव्हा डॉक्टर पाठक कडे पोहचेन आणि त्यांना हे सगळं सांगेन असं झालं होत.
इकडे समीर कित्येक वेळ एका झाडाजवळ बाकड्यावर बसून होता. त्याला क्षणाच भानच राहील नव्हतं. तो शांत बसून होता.

शीतल डॉक्टर पाठकच्या क्लिनिक मध्ये पोहचते. क्षणभर वाट पाहिल्यानंतर ती डॉक्टर पाठकांच्या केबिन मध्ये येते , समोर शीतलला बघून ते लगेच म्हणतात,
“शीतल !!ये बस !! कसं काय येणं केलंस आज माझ्याकडे !! “
“डॉक्टर मी pregnant आहे !!”
डॉक्टर क्षणात तिला बोलतात,
“अरे वां!! अभिनंदन !! अभिनंदन !!”
“Thanks !! पण डॉक्टर आज मी तुमच्याकडे वेगळ्याच कारणाने आली आहे !!”
“हो बोल ना!! “
“मला abortion करायचं आहे !!”
“What ?? Abortion आणि ते का ??”
शीतल डॉक्टरांना सगळं काही सांगते, पाठक सगळं काही ऐकून घेतल्यावर म्हणतात,
“हे बघ शीतल !! तुझे वडील आणि मी लहानपणीचे मित्र आहोत आणि त्यामुळे तुझे वडील जसे शब्दाला काटेकोर वागतात , तसाच गुण तुझ्यातही आहे !! पण मला वाटतं यावेळी तू थोडा विचार करावास !! “
“कसला विचार डॉक्टर ??”
“आई व्हायचा !!”
“पण मला नाही व्हायचं आई !! मला मुळात त्या typical बाईपणात पडायचं नाहीच आहे !! मला स्वतंत्र जगायचं आहे !! आयुष्यभर !! ना कोणते बंधन ना कोणत्या भिंती !! “
हो पण हे तुला कोण म्हणत की आईपण आल्यावर स्त्रीचं आयुष्य हे एका मर्यादेत राहत म्हणून ??”
“म्हणायला कशाला हवं !! मी पहातेच आहे ना !!समोर उदाहरण आहेच !! माझी आई , सासूबाई !!”
“चुकते आहेस शीतल !! हे बघ मला तर खर abortion ही गोष्टच आवडत नाही !! पण कधी कधी नाईलाजाने मला ते करावं लागत !! त्या रात्री मला झोप लागत नाही नीट शीतल !! शेवटी एक जीव हे जग पहायच्या आधीच गेलेला असतो !! तरीही तू विचार कर !! उद्या दुपारपर्यंत तुझा निर्णय नाहीच बदलला तर मग नाईलाज आहे !!”

शीतल काहीच न बोलता क्लिनिक मधून बाहेर पडली. घाईघाईत घरी गेली , घरी समोर आईला पाहून क्षणभर अडखळली,
“काय ग शीतल !! घाईघाईत गेलीस काय आणि आलीस काय ?? समीर च पण तेच !! काय चाललंय तुमच्या दोघांचं !! मला तर काही कळतं नाहीये !! “
“काही नाही ओ आई !! तुम्ही समजतं आहात तस काहीच नाहीये !! “
“मग एवढं घाईघाईत कुठे गेली होतीस !! “
क्षणभर शीतल अडखळली तिला काय बोलावं काहीच कळलं नाही ,
“आई ते होय !! असच !! एक मैत्रीण आली होती भेटायला म्हणून गेले होते !! तिला घाई होती ना जायची म्हणून लवकर गेले होते.
“बरं ठीक आहे !! जेवायला वाढते ,चला जेवायला बसुयात आता !! समीरचे बाबा केव्हाची वाट पाहायलेत तुमच्या दोघांची !! “
“बाबा आलेत ? “
“हो !! तू गेलीस आणि ते आले दुपारच्या फ्लाईटने दिल्लीवरून !!””

शीतल जरा मनातून घाबरली कारण हे सगळं समीरच्या बाबांना कळलं तर काय होईल या विचारानेच ती घाबरून गेली.

“काय ग समीर कुठे गेलाय ?? फोन केला तर उचलत नाही !! “
“उचलत नाही ??”
“हो !!”
“बरं मी पाहते !!”
एवढं बोलून शीतल आपल्या बेडरूम मध्ये आली. तिला आता समीरच टेन्शन यायला लागलं होत , मगाशी तो घाईघाईत कुठे गेला ते पहिलाच नव्हतं. तिने कित्येक कॉल त्याला केले पण एकही कॉल त्याने उचलला नाही. शेवटी नाईलाज होऊन ती आई बाबांन सोबत जेवली. समीरच्या उशिरा येण्याचं कारण तिने तो ऑफीस कामाबद्दल मीटिंग करायला गेल्याच सांगितलं.

समीरची वाट पाहत पाहत रात्रीचे बारा वाजले. आता मात्र शीतलला काय करावं काहीच कळत नव्हतं. आई बाबांना जाऊन सांगावं तर मगाशी खोटं का बोलले ते काय सांगावं हा प्रश्न. अशावेळी ते क्षणही खूप जड चालतात असेच जणू तिला वाटायला लागलं होतं, त्याची वाट पाहत ती हॉल मध्येच बसून होती, आणि रात्रीच्या २ वाजता दरवाज्याची बेल वाजते

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *