आई बाबा || Aai Baba Marathi Poem ||

“आई तुळशी समोरचा दिवा असते!!
बाबा त्याचा मंद प्रकाश असतात!!
आई अंगणातील रांगोळी असते!!
बाबा त्या रांगोळीतला रंग असतात!!

आई देवासमोर लावलेली निरांजन असते!!
बाबा त्याची ज्योत असतात!!
आई घरभर पसरलेली धूप असते!!
बाबा त्यातील सुगंध असतात!!

आई मनावरचा संस्कार असते!!
बाबा ते घडवणारे असतात!!
आई आयुष्याची वाट असते!!
बाबा त्या वाटेवर चालवणारे असतात!!

आई एक वाक्य असते!!
बाबा वाक्यातील शब्द असतात!!
आई एक कविता असते!!
बाबा त्याचा भाव असतात!!

सूर्याचे तेज म्हणजे आई असते!!
बाबा त्यांची किरणे असतात!!
आई असते आपली माऊली!!
त्या माऊलीची साथ बाबा असतात!!

जिद्द म्हणजे काय हे आई असते!!
मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात!!
आई विना हे जग अधुरे असते!!
बाबा हे सारे विश्व असतात!!”

✍️ © योगेश खजानदार

ALL RIGHTS RESERVED

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *