आई || कथा भाग ८ || Mother|| Daughter || Story ||

भाग ८

शीतल आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करत होती. इकडे समीर आपल्या ऑफिसमध्ये कामात व्यस्त होता. तेवढ्यात समोर ठेवलेला फोन वाजतो. समीर फोन उचलताच समोर आई बोलत होती.
“समीर !!”
आईचा आवाज ऐकताच समीर चकित होऊन बोलू लागला.
“आई ??”
“हो !! मीच बोलते आहे !! कुठे आहेस तू ? अरे लवकर घरी ये !!”
” काय झाल आई ?? आणि एवढी घाबरल्या सारखी बोलतेस तू !! काय झालंय ??”
“अरे त्रिशा !!”
” काय झालं त्रिशाला आई !!”
” अरे ती बेशुद्ध पडली आहे !! खेळता खेळता अचानक जागेवर पडली !! मी आणि बाबा शेजारच्या दवाखान्यात जातोय तू तिकडेच ये पटकन !!”
“काय ?? कस काय पडली ती बेशुद्ध !!! काय झालंय आई ??”
” हे बघ जास्त विचारत बसू नकोस तू ये पटकन !!” आई घाबरल्या स्वरात समीरला बोलत होती.

आईचा फोन ठेवताच समीर लगेच आपल्या जागेवरून उठला . त्याला काहीच सुचत नव्हतं. समोर कोणी आहे याचं भानही त्याला राहील नाही.
” अरे समीर !! व्हॉट हॅपन ?? “
समीरचा बॉस अचानक धावत निघालेल्या समीरला विचारतो.
“सॉरी बॉस !! मुलगी आजारी आहे !! आय हॅव टू गो !!”
” अरे हो पण !! झालंय तरी काय !!”
” मलाही नीटसं अस माहीत नाही !! मी उद्या आल्यावर सांगेन ना !!”
“ओके !! जा !! तुझी तिकडे जास्त गरज आहे !!”
“थॅन्क्स !! “

समीर ऑफिस मधून धावत पळत निघाला. त्याला आजूबाजूला काय चाललंय याचही भान राहिलं नाही. रस्त्यात त्याची गाडी सुसाट निघाली. त्याला त्यावेळी आपल्यापेक्षा आपल्या मुलीची जास्त काळजी वाटू लागली. इकडे शीतलला याची काही माहिती नव्हती.

“माझी लाडकी लेक त्रिशा !! काय झालं असेल तिला?? ती अशी कशी बेशुद्ध पडली !! काहीच कळत नाहीये !! तिला काही झालं तर मी काय करायचं !! आई बाबा यांना काय म्हणून मी समजवायच !! देव करो आणि सगळं काही ठीक असो !! माझ्या त्रिशावर देवाची कृपा आहे आणि ती राहिलंच !! तिला काही होणार नाही !! “
समीर दवाखान्यात आला. समोर आई बाबा आणि त्यांच्या खांद्यावर असलेली त्रिशा पाहून त्याला काय बोलावं काहीच सुचलं नाही.

“बाबा !! काय म्हणाले डॉक्टर ??”
“काही नाही समीर आता काळजी करण्यासारखं काही नाही एवढच म्हणाले..!! तरीही एकदा तू त्यांना भेटून ये !!”
“ठीक आहे बाबा !!”
समीर समोरच असलेल्या डॉक्टरांच्या केबीनकडे गेला,
“डॉक्टर !!”
“या !! बसा ना !! “
“थँक्यू डॉक्टर ! मी समीर दिक्षित !! त्रिशाचा वडील !!”
“ओके !! “
“डॉक्टर काय झालंय त्रिशाला !! म्हणजे ती अशी अचानक बेशुद्ध का पडली !!??”
” समीर त्रिशाला आजार असा काही नाही झाला !! पण तिला म्हणावा असा पोषक आहार होत नाहीये !! त्यामुळे तिला अशक्तपणा आलाय !! तिची आई वेळेवर दूध पाजते ना तिला ??”
“डॉक्टर !! अक्च्युल्ली तिची आई नसते इथे !! कामानिमित्त बाहेर गावी असते !! त्यामुळे आईच दूध तिला मिळतच नाही !!”
“ओके !! ठीक आहे !! मग दुसरे कोणतेही दूध दिले तरी चालेल !! आणि तिला काही गोळ्या लिहून देतोय त्या सकाळ संध्याकाळ देत राहा !! म्हणजे ती एकदम ठणठणीत बरी होईल !! “
“ठीक आहे डॉक्टर !! “

समीर डॉक्टरांना भेटून बाहेर आला. डॉक्टर काय म्हणाले हे आई बाबांना सांगितल्या नंतर ते त्रिशाला घेऊन घरी गेले. समीर तिच्या जवळच बसून होता. त्रिशा घरी येताच शांत झोपी गेली. समीर कित्येक वेळ तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या जवळ येत बाबा म्हणाले,
“काही नाही झालं त्रिशाला समीर !! “
“चल उठ आता !! आणि फ्रेश हो!!”
“हो बाबा !! “

समीर फ्रेश व्हायला गेला. इकडे शीतल तिचे प्रेझेंटेशन अगदी सुंदर मांडत होती. तिच्या या प्रेझेंटेशनने समोरचे सगळे अगदी खुश झाले.

“अप्रतिम शीतल !! माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान केलंस तू प्रेझेंटेशन !!” शीतलची बॉस शीतलला म्हणाली.
“थँक्यू मॅम !!”

शीतलला ऑफिसच्या कामात केव्हा संध्याकाळ झाली हे कळाल सुद्धा नाही. ती घड्याळाकडे पाहत शेजारीच बसलेल्या मेघाल म्हणाली.
“आज दिवस कसा गेला कळाल नाही !! मी निघते आहे मेघा !! तेवढं तू बाकीचं सगळं करून घेशील ना !! “
“नो प्रोब्लेम मॅम !! तुम्ही निघा !! मी करते हे सगळं !!”
“थॅन्क्स !!”

शीतल सगळं आवरून फ्लॅटवर यायला निघाली. तिला आज जे घडलं ते सगळं कधी एकदा समीरला सांगेन अस झाल होत. ती अगदी धावत पळत घरी आली. हातातली बॅग बाजूला ठेवून ती समीरला फोन लावते,

एक दोन वेळा फोन वाजून बंद झाला,
“हा समीर फोन का उचलत नाहीये ??”
पुन्हा ती फोन लावते, आणि समीर फोन उचलतो,
“समीर !! अरे कुठे होतास तू !! कितीवेळा फोन लावत होते मी !! उचलत का नव्हतास ??”
“मी फ्रेश व्हायला गेलो होतो !! “
“इतक्या लवकर !! तू घरी आहेस ??”
“हो !! “
” बरं ऐक ना !! आज माझं प्रेझेंटेशन एवढं आवडलं त्यांना !! आज माझा दिवस खूप मस्त गेला!! सगळ्यांनी माझं नुसतं तोंडभरून कौतुक केलं !!”
“अरे व्हा !! गुड !! “
“हो ना !! आज एवढं भारी वाटतंय ना !! इकडे आल्यापासून मला माझ्या मनासारखं अस काही वाटतच नव्हतं !! पण आज वाटतंय !! “
“छान !!” समीर थोड तुटक बोलला.
कित्येक वेळ शीतल समीरला आज काय झालं हे सांगत राहिली. समीर फक्त ऐकत राहिला.
“बरं तू ऑफिसमधून लवकर का आलास घरी ??”
शीतलने असे विचारताच समीर क्षणभर शांत राहिला,
“काही नाही असच !! “
समीरच्या बोलण्यातला रुक्षपणा शीतलला जाणवल्यावाचून राहिला नाही, काहीतरी झालंय हे तिला लक्षात आलं,
” काय झालंय समीर ?? सांगशील का ??”
” आज तुझा मूड खूप चांगला आहे शीतल !! आज राहूदे ना !! उद्या बोलू आपण !!”
” समीर !! काय झालंय ?? आणि त्रिशा कुठे आहे ??”
” झोपली आहे त्रिशा !! औषध दिलं आईने तिला आल्यावर आणि ती झोपली !!”
“औषध ?? कसलं ??”
” आज त्रिशा खेळता खेळता अचानक बेशुद्ध होऊन पडली होती!!”
“काय ?? काय झालं त्रिशाला समीर !! मला आत्ताच्या आत्ता तिचा आवाज ऐकायचा आहे !! “
“शीतल !! शीतल !! शांत हो !! “
“काय शांत होऊ मी समीर !! आणि तुला साधा एक फोनही करावासा वाटला नाही मला !! मी तिची आई आहे समीर !!”
शीतलच्या डोळ्यात पाणी आले, ती काय बोलत आहे हेही तिला कळत नव्हतं, क्षणात तिच्या डोळ्यांसमोरून त्रिशाच्या कित्येक आठवणी येऊन गेल्या,
” डॉक्टर म्हणाले अशक्तपणा आहे !! होईल ती नीट !! शीतल तू तुझ्या कामात लक्ष दे !! आम्ही आहोत तिची काळजी घ्यायला !! “
“समीर मी येतेय तिकडे !! “
“शीतल !! ऐक माझं !! एवढं काही झालं नाहीये !!”
” नाही समीर !! मी येतेय तिकडे !! “
” ऑफिस काम , अस सोडून नाही येता येणार शीतल तुला !! “
“ते काही मला माहित नाही !! मी येतेय समीर , मला नाही चैन पडणार इकडे !! “

शीतल फोन ठेवते तिला क्षणभर सगळं जागेवर थांबून गेल्यासारखं वाटतं होत, त्या घाईगडबडीत ती आपली बॅग भरायला घेते, त्यावेळी तिच्या मनात दुसर काहीच येतं नव्हतं. कधी एकदा तिला त्रिशाला भेटेन अस झाल होत.

शीतल सगळं क्षणात सोडून आपल्या घराकडे निघाली होती आपल्या बाळासाठी, आपल्या त्रिशासाठी.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *