Share This:

भाग ३

शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही.
” थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!”
शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली.
“बोला ना बाबा !!
“डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं.”
“बाबा ते ! मी .. मी!! “
“काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !! अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! “
“पण बाबा मला त्यावेळी काहीच सुचलं नाही !! माझ्या आयुष्यात हा असा अचानक कोणता खड्डा येईल असं मला कधी वाटलं ही नव्हतं !! “
“खड्डा ?? आयुष्यातल्या एवढ्या सुंदर गोष्टीला तू खड्डा म्हणतेय!!! त्यांना विचार शीतल दुःख म्हणजे काय असतं जे वर्षानुवर्षे आपल्याला मुल व्हावं !! तिन आई व्हावं, त्याने बाबा व्हावं म्हणून वाट पाहतात !! खूप सुंदर गोष्ट आहे ही बाळा !! “
“बाबा !! पण माझ्या करिअरच काय ?? “
” कित्येक स्त्रिया आज आपला संसार सांभाळून करतातच ना करिअर !!”
शीतल गप्प राहिली तिला पुढे काय बोलावं काहीच कळलं नाही. बाबा मात्र तिला बोलत राहिले.
“डॉ पाठक माझे चांगले मित्र आहेत म्हणून मला हे कळलं !! “
“चुकले बाबा !!”
“तू माझी माफी मागावी यासाठी मी बोलत नाहीये हे !! तू आपली जबाबदारी ओळखावी यासाठी बोलतोय मी !! तू एकुलती एक मुलगी आमची , तुझं चांगलं व्हावं एवढच मला वाटत !! बरं चल आता सगळ्यांना बोल तिथे जाऊन !!”

शीतल आणि तिचे बाबा पुन्हा सर्वात येऊन बसले. शीतल हळुच समीर जवळ येऊन बसली. तिच्यातील बदल समीरला लगेच कळाला. ते छोटे कुटुंब कित्येक वेळ गप्पा मारत बसले. शीतल आता आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेऊ लागली. समीर ,सासूबाई ,सासरे सारे तिला पाहिजे ते हवं ते देऊ लागले. त्या सुखी संसारात कोणीतरी नवीन येणार या आनंदाने ते सारे खूष होऊ लागले. आज्जी आजोबा आपल्या नातवासाठी नाव शोधू लागले. समीर आता पहिल्यापेक्षा शीतलची जास्त काळजी घेऊ लागला. समीरला आता दुसरे जग जणू दिसेनासे झाले.

पाहता पाहता दिवसा मागून दिवस जाऊ लागले. पोटातले बाळ आता हळूहळू आकार घेऊ लागले आणि अखेर या जगात येण्यासाठी जणू तेही आतुर झाले. शीतल बाळंतपणासाठी डॉक्टर पाठक यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाली.

“समीर ,पाहता पाहता दिवस कसे गेले कळल नाही !!”
“होना !!” समीर शीतलच्या जवळ बसून बोलत होता.
“डॉक्टर पाठकानी तारीख उद्याची दिली आहे !! उद्या तुझ्या आणि माझ्यामध्ये अजून कोणीतरी असेल !! आपलं ” समीर बोलत राहिला.
” सगळं कसं भरून जाईल हे घर !! होना !! आणि मग आपण दोघं मिळून त्याला मोठ करू , त्याच्यावर संस्कार करू , त्याला बोलायला शिकवू !!”
“आपण ??”शीतल मध्येच बोलली.
“हो मग !! अजून कोण ??”
“तू !! मी फक्त जन्म देणार बाळाला !! बाकी सांभाळायचं वैगेरे तुझ्याकडे !!”
” बरं बरं !! करिअर ना !! “
“हो !!”

शीतल आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. शीतल नकळत येणाऱ्या बाळासाठी आपल्या मनाची समजूत काढत होती. एका बाजूने तिला मुक्त फिरायच होत, जिथे तिला आपल्या शिवाय दुसरं कोणी नको होत पण आता दुसर मन तिच्यातील आईपण जागे करत होत. पण नकळत ती त्याला गप्प करत होती. त्या आईपणाला नाकारत होती.

“समीर !!” मध्यरात्री शीतल जोरात ओरडली. तिला असह्य होणाऱ्या कळा सुरू झाल्या होत्या.
शीतलच्या आवाजाने समीर जागा झाला. त्याला शीतलला काय होतंय हे कळायला वेळ लागला नाही. तो पटकन जागेवरून उठला बाहेर आई बाबा , शीतलचे आई बाबा यांना शीतलला त्रास सुरू झाल्याचे सांगत तो थेट नर्सकडे गेला. हॉस्पिटल स्टाफ लगेच धावत शीतलला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले. सारे बाहेर बसून शीतल आणि मुलाच्या सुखरूप असण्याची प्रार्थना करू लागली.

कित्येक वेळ शीतल त्या असह्य वेदना सहन करत होती. आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार आहे यासाठी सार काही सहन करत होती. त्या असह्य वेदना आणि बाजूला तिला धीर देण्यासाठी थांबलेला समीर तिला क्षणभर खूप काही सांगत होते. शीतल तू एकटी नाहीयेस , ते येणारं बाळही तुला नकळत बोलत असेल ना !!, शीतलला जणू सगळं जग आपल्या जवळ थांबलं आहे असेच वाटू लागले होते.

आणि अचानक त्या लहान बाळाचे रडू ऐकू आले. शीतलने त्या बाळाकडे पाहीले आणि शांत झाली. त्या बाळाला पाहताच ती जणू त्या वेदना विसरून गेली. समीर तिच्याकडे हसून पाहू लागला. शीतलही समीरकडे पाहून हसली. त्या साऱ्या वेदना विसरू ती हसली. समीरने बाळाकडे पाहिले. तो धावत बाहेर आला आणि सर्वांना सांगू लागला. आई बाबा मुलगी झाली !! मी बाबा झाली.!! समीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई बाबा एकमेकांना आनंदाने सांगू लागले. शीतलचे आई बाबा समीरच्या या आनंदाला पाहून अजून आनंदून जाऊ लागले.

“समीर !! ” डॉक्टर पाठकानी समीरला बोलावले.
“बोला डॉक्टर !!”
“थोड्याच वेळात शीतलला तिच्या रूममध्ये घेऊन येतील तुम्ही तिथेच वाट पाहिली तरी चालेल !!”
“ओके डॉक्टर !!”

समीर , आई बाबा , शीतलचे आई बाबा शीतल आणि बाळ दोघांचीही आतुरतेने वाट पाहू लागले.

क्रमशः