आज आमच्या मातोश्रीचा वाढदिवस… सकाळी उठुन पहिले तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. तरी तिचं रोजच चालुच होतं काम आणि सकाळच आवरायच.. शुभेच्छा दिल्यावर लगेच म्हणाली
“बस, चहा करुन देते !” ,
मी लगेच म्हटलं
“आई, तु बस मी चहा करतो आज खास तुझ्यासाठी !!..”
चहा घेऊन झाला की जरावेळ गप्पा मारत बसलो… जुन्या वाढदिवसाच्या आठवणी निघाल्या .. आई खुप काही बोलत होती .. प्रत्येक वाक्यात मी होतो , भैय्या होता , डॅड होते .. प्रत्येक आठवणीत सगळं घर सामावलं होतं..
आई!! सगळं घर सामावुन घेणारी आई !! त्या आठवणीत ती स्वतःला हरवुन जात होती. आम्हाला सगळ्यांना शोधत होती.. वाढदिवस तिचा होता पण कौतुक आमच चाललं होतं ..
मध्येच मी तिला थांबवलं तिला म्हटलं
” आई आज वाढदिवस तुझाय!”
ति म्हणाली
” माहितेय रे मला!’ मग तुझ काहीतरी सांग ना!!”
त्यावेळी ती सहज म्हणुन गेली,
” हे सगळंच माझय रे!!” बोलायला काहीच उरलं नव्हतं.
मी दोन मिनिटं विचार करत बसलो. जिचं सगळं आयुष्यच आपल्यासाठी त्या आईच्या आठवणीत फक्त आपलं घर आणि कुटुंब यांच्या कितीतरी सोनेरी आठवणी अक्षरशः जश्यास तशा लिहुन ठेवल्या होत्या.. ती त्या आठवणीत रमत होती .. जगत होती .. निस्वार्थ भावनेने ती आमच्या जगात स्वतःच आयुष्य मजेत घालवत होती.. कधी कोणती तक्रार नाही, कधी कोणती मागणी नाही .. प्रेमाचा झरा वाहत राहावा तस तिचं प्रेम सतत वाहत होतं. नकळत त्या प्रेमाच्या झरा आम्हाला कधी वाहत घेऊन जातो ते आम्हाले ही कधी कळाल नाही .. आम्ही फक्त वाहत होतो ..
“काय रे! कसला विचार करतोयस?”
तेवढ्यात तिने मला विचारलं मी भानावर आलो..
“काही नाही!” म्हणुन मी मान डोलावली.
लगेच ती उठुन कामात व्यस्त झाली.. मी तिच्याकडे कित्येक वेळे पहातच होतो.. कुटुंबासाठी झटणारी ती आई खरंच आमची ताकद होती हे त्यावेळी कळालं.. विचारांचं चक्र तसंच चालल होतं.
आई !! माझी आई .. तिचा आज वाढदिवस.. जिने मला घडवलं त्या जन्मदात्या आईचा वाढदिवस!!
✍️योगेश