"मन आणि अहंकार, बरोबरीने चालता!! दिसे तुच्छ कटाक्ष, बुद्धी ही घटता!! व्यर्थ चाले मीपणा, आपुलकी दुर दिसता!! तुटता ती नाती, गर्व करे अहंमपणा!! नको तो स्वार्थ, नी शब्दात कटुता!! सोड ती साथ, वाट पाहे तो आपुला!! निस्वार्थ शांत, गोड नाती ती जपता!! का कास धरावी, अहंकारी तो एकटा!! मन आणि अहंकार, बरोबरीने चालता …!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
