"स्वतःच अस्तित्व शोधताना
 मी कुठेतरी हरवुन जाते!!
 समाज, रुढी, परंपरा यात आता
 पुरती मी बुडून जाते!!

 कोणाला मी हवीये 
 तर कोणासाठी बोज होऊन जाते!!
 एक स्त्री म्हणून जगताना
 आज खरंच मी स्वतःस पहाते!!

 माझेच मीपण सोडुन मी
 तुझे पुरुषत्व जपत राहते!!
 कधी खंत मनाची तर
 कधी स्वतःस सावरून जाते!!

 कधी घोटला गळा माझा
 पोटातच मला मारले जाते!!
 कधी समाज लाजेचे रोज
 कितीतरी बलात्कार होत राहते!!

 तरीही धडपड माझी आज
 तुझ्यासवे मी चालत जाते!!
 स्त्री म्हणुन जगताना मी
 नेहमीच तुझी साथ देत राहते!!

 स्वतःच अस्तित्व शोधताना
 खरंच मी हरवुन जाते..!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

असे कसे हे !! Love POEM

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!सांग काय…
Read More

असावी एक वेगळी वाट !!!

“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!!कधी बहरावी वेल…
Read More