मनात आहे !! पण ओठांवर येत नाही !! सारंच काही !! सांगता येत नाही !! तुला पाहिल्या शिवाय!! करमत ही नाही !! तुला ते कळू नये!! हे लपवता ही येत नाही !! आठवांचा पाऊस आता!! थांबत ही नाही !! चिंब त्यात भिजावे !! मन काही ऐकत नाही !! वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !! श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !! कधी तुझा भास !! मनास कळतं नाही !! मनातले तुझे चित्र !! आजही पूर्ण होत नाही !! वेड्या मनाचे तुला !! शोधणे थांबत नाही !! शोधूनही न सापडावी !! ती तू मला भेटत नाही !! असे कसे मनाचे !! कोडे हे सुटत नाही !! मनातले हे भाव !! ओठांवर येत नाही!! ✍️ योगेश
ALL RIGHTS RESERVED