Share This:
मी म्हणालो थांब जरा !! असेच नाते तोडू नकोस !!
प्रेमाच्या या बंधनाला !! असेच सोडून जाऊ नकोस !!

कुठे भरकटली वाट आपली !! त्या वाटेस आपले करू नकोस !!
मिळून बांधलेल्या घराला या !! असेच सोडून जाऊ नकोस !!

वाईट कदाचित ही वेळ असेल !! उगाच सोबत घेऊ नकोस !!
सुखी क्षणांच्या आठवांना तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!

बरंच काही आहे मनात !! मनात त्या साठवू नकोस !! 
भरल्या डोळ्यांनी आज तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!

मी दोन पावले पुढे येईल !! तूही तिथे थांबू नकोस !!
जड त्या पावलांन सवे तू !! असेच सोडून जाऊ नकोस !!

उरले फक्त माझ्यात तुझेपण !! तुझ्यातला मी विसरू नकोस !!
रित्या या जगात तुझ्याविण !! असेच सोडून जाऊ नकोस !!

साद जणू आहे ही भेटीची !! विरह तो तू देऊ नकोस !!
प्रेमाच्या या बंधणाला !! असेच सोडून जाऊ नकोस !! 

✍️© योगेश खजानदार

*All Rights Reserved*