"असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !! रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!! कधी बहरावी वेल ती सुंदर, सुगंध दरवळण्यासाठी !! असावी एक गोड ती आठवण , मनास सुखावण्यासाठी!! झुळूक अनोळखी एक ती यावी , सोबत मागण्यासाठी!! क्षणिक आनंद देऊन जावी , परतून येण्यासाठी !! खळाळत्या नदीस सांगावे गुपित, मनसोक्त बोलण्यासाठी!! असावी एक मैत्री अफाट, समुद्रास भेटण्यासाठी !! पडाव्या त्या सरी कित्येक, चिंब भिजण्यासाठी!! भिजलेल्या त्या पायवाटेवर , पाऊलखुणा उमटवण्यासाठी!! जीर्ण झालेल्या पानांसही , जिवंत करण्यासाठी !! असावी ती ओढ मनात , आपल्यास भेटण्यासाठी !! चंद्र तो उगाच खुणावतो, चांदण्यात फिरण्यासाठी!! मोजल्या कित्येक ताऱ्यांना, पुन्हा विसरण्यासाठी !! कधी हसता , कधी रडता, कित्येक भाव टिपण्यासाठी !! असावी एक ओळख आपलीच, स्वतः स शोधण्यासाठी !!! असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !!" ✍️© योगेश *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
आई || MARATHI KAVITA || AAI ||
तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.
तु कधी रु…
Read Moreमझ विश्वची अनुरूप || MOTHER || MARATHI KAVITA ||
शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप
मझ घडविले तु
हे संसार …
Read Moreबाबा || MARATHI POEM
बाबा मनातल थोडं
आज सांगायचं आहे!!
बस जरा थोडा वेळ
तुझ्याशी बोलायच आहे!!
किती कष्ट करशील
हा संसा…
Read Moreआई || AAI MARATHI KAVITA || POEMS ||
मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई
चुकल ते सम…
Read Moreमातृदिन || MATRUDIN || POEMS || MARATHI ||
शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप
मझ घडविले तु
हे संसार दाखव…
Read Moreमनातलं प्रेम
“अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!”
त्याने रिप्लाय केला,
“मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही र…
Read Moreआईचा वाढदिवस || AAICHA VADHDIVAS || MARATHI || BIRTHDAY ||
” आई आज वाढदिवस तुझाय!”
ति म्हणाली
” माहितेय रे मला!’ मग तुझ काहीतरी सांग ना!!”
त्यावेळी ती सहज म्…
Read Moreशब्द की भावना
पुन्हा जगावे ते क्षण
तुझ्या सवे आज सखे
तु समोर असताना
व्यक्त व्हावे मन जसे
ती सांज तो वारा
पुन्हा त…
Read Moreखंत… || KHANT MARATHI POEM ||
तो दरवाजा उघडला होता
तीच्या डोळ्यात पाणी होते
आईची खंत काय आहे
ते मन आज बोलतं होते
नकोस सोडुन जा…
Read More
धन्यवाद
सुंदर