"अश्रुसवे उगाच बोलता शब्दही का भिजून गेले आठवणीतल्या तुला पाहता हळूच मग ते विरून गेले!! समजावले मनास किती त्या तुझ्याच जगात हरवून गेले बोलले किती मला ते आणि निशब्द होऊन निघून गेले!! कधी भास होऊन भेटता क्षणभर सोबत देऊन गेले कधी तुझ्या भेटीस मग का अधुऱ्या मिठीत राहून गेले!! सांग कधी येशील भेटण्यास शब्दही तुझ विचारून गेले वहितल्या त्या पानावरती तुझ्याच साठी झुरून गेले!! ओढ तुझी लागली नजरेस कित्येक भाव सांगून गेले उरल्या या कित्येक क्षणात तुलाच पापण्यात साठवून गेले!! अश्रुसवे उगाच बोलता शब्दही का भिजून गेले…!!" ©योगेश *ALL RIGHTS RESERVED*