"नकळत जुळले बंध असे हे, मनासही ते उमजेना !! नजरेच्या त्या भाषे मधूनी, बोलल्या शिवाय राहिना!! कधी विरहात मी, कधी सोबत तू, भेट अशी का घडेना !! कधी भास तू , कधी आभास मी, ओढ ती काही संपेना !! असे कसे हे मनातले सारे, शब्दही त्यास सापडेना!! भाव मनीचे, तुला आज का?? शब्दाविना कळेना !! रात्र अशी नी दिवस कसा हा, वेळ ती काही जाईना !! क्षण नी क्षण मोजावे किती, आठवांचा पाऊस थांबेना!! सांग कसे हे, समजावू त्यास मी? मलाच काही कळेना!! तुझ्या प्रेमाची साथ हवी मज, मलाच सांगता येईना !! की, नकळत जुळले बंध असे हे, मनासही ते उमजेना !!" ✍️©योगेश