अल्लड ते हसू …!! SMILE MARATHI KAVITA ||

Share This
अल्लड ते तुझे हसू मला
 नव्याने पुन्हा भेटले
 कधी खूप बोलले माझ्यासवे
 कधी अबोल राहीले
 बावरले ते क्षणभर जरा नी
 ओठांवरती जणू विरले !!

 अल्लड ते हसू मला का
 पुन्हा तुझ्यात हरवून बसले
 बोलले त्या नजरेस काही
 मनात ते साठवून ठेवले
 येणाऱ्या शब्दासही उगाच
 आपलेसे करून घेतले
 गंधाळलेल्या त्या फुलासही
 उगाच भांडत बसले!!

 अल्लड ते हसू मला का
 पुन्हा नव्याने बहरताना दिसले
 कधी त्या चांदणी सवे
 चंद्रास सतावताना भासले
 सांजवेळी बुडणाऱ्या सूर्यास
 पाहणारे जणू मज वाटले
 मंद ते उनाड वारे जणू
 वाटेवरती त्यास भेटले
 गालातल्या खळीस पाहून का
 पुन्हा नव्याने प्रेमात पडले!!

 अल्लड ते तुझे हसू मला का
 नव्याने पुन्हा भेटले …!!!
 ✍️©योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक लाट. !! EK LAAT

अलगद स्पर्श करून जाणारी समुद्राची ती एक लाट प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी पाहात होती माझीच वाट…
Read More

Next Post

सांग सांग सखे जराशी..!! || LOVE POEM ||

Tue Dec 25 , 2018
सांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का