Contents
अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले !! अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात हरवून बसले बोलले त्या नजरेस काही मनात ते साठवून ठेवले येणाऱ्या शब्दासही उगाच आपलेसे करून घेतले गंधाळलेल्या त्या फुलासही उगाच भांडत बसले!! अल्लड ते हसू मला का पुन्हा नव्याने बहरताना दिसले कधी त्या चांदणी सवे चंद्रास सतावताना भासले सांजवेळी बुडणाऱ्या सूर्यास पाहणारे जणू मज वाटले मंद ते उनाड वारे जणू वाटेवरती त्यास भेटले गालातल्या खळीस पाहून का पुन्हा नव्याने प्रेमात पडले!! अल्लड ते तुझे हसू मला का नव्याने पुन्हा भेटले …!!! ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
अलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट…
Read Moreन भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा …
Read Moreसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का…
Read Moreकधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय …
Read More