Share This:

१. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद केली जाणार.
२. नव्या आरोग्य योजनांवर 64 हजार,180 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा संकल्प, १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची घोषणा केली गेली.
३.जल जीवन मिशन योजनेसाठी 2 लाख 87 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली.
४. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटी निधीची तरतूद करण्यात आली.
५. कोविड लसिकरणासाठी 35 हजार कोटिंची तरतूद करण्यात आली.
६. प्रधानमंत्री यांनी 2.76 लाख करोड रुपयांची पंतप्रधान कल्याण योजनेची घोषणा केली.
७. मेगा इन्वेस्मेंट टेक्सटाइल पार्क उभे केले जणार.
८. डी एफ आय साठी 3 वर्षांकरिता 5 लाख कोटीं तरतूदची घोषणा केली.
९. वेगवेगळ्या नव्या आरोग्य कल्याण योजनेसाठी 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.
१०. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1लाख 78 हजार कोटींची तरतूद केली.
११. वायुप्रदूषण समस्येशी लढण्यासाठी 42 शहरांसाठी 2200 करोड रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
१२. १७ नव्या पब्लिक हेल्थ युनिटची सुरुवात केली जाणार.
१३. देशात 7 नवे मेगा इन्वेश्टमेंट park उभे केले जाणार.
१४. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणिच्या शहरात गॅस पाईप लाईन विस्तार करण्याची योजना.
१५. येत्या वर्षात 4.39 लाख कोटी खर्च केले जाणार.
१६. मुंबई कन्याकुमारी महामार्गाची 64 हजार कोटीची तरतूद
१७. जल जीवन मिशन (शहर ) ची केली जाणार, ज्यामध्ये 4378 शहरात 2.86 करोड घरगुती नळ देण्याचा प्रयत्न.
१८. नाशिक मेट्रोसाठी 2092 तर नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार.
१९. नवी राष्ट्रीय रेल योजना सुरू केली जाणार, 2030 पर्यंत हायटेक रेल्वे करण्याचे ध्येय.
२०. ग्राहकांना आपल्या आवडीने वीज कंपनी निवडण्याची मुभा.
२१. सार्वजनिक बसेससाठी 14 हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली जाणार.
२२. उज्ज्वला योजने अंतर्गत 1 करोड लोग जोडले जाणार.
२३. सरकारी बँकांमध्ये 22 हजार कोटी टाकले जाणार.
२४. गेल्या काही वर्षांत वीज निर्मिती क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचा दावा.
२५. केरळ , तामिळनाडू , पश्चीम बंगला सह आसामसाठी मोठ्या प्रमाणात योजना.
२६. नॅशनल हायड्रोजन मिशनची स्थापना केली जाणार.
२७ विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा 49% वरून 74 % वर केली जाणार.
२८. IDBI आणि दोन सरकारी बँकांचे तसेच एका सामान्य विमा कंपनीचे खाजगीकरण , LIC IPO लाँच केला जाणार.
२९. Msp system मध्ये मोठे बदल केले गेले.
३०. 2021-2022 आर्थिक वर्षात गुंतवणुकीत 1लाख 75 हजार कोटींचा प्राप्तीचा अनुमान केला आहे.
३१. BPCL, एअर इंडिया , पवनहंस, IDBI निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार. मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवनिकीवरून 1लाख 75 हजार कोटीचा निधी उभारणार असल्याचा संकल्प.
३२. 1.03 लाख करोड रुपयाच्या गुंतवणुकीतून तामिळनाडू राज्यात 3500 किमी राष्ट्रीय राजमार्ग निर्माण कार्य, तसेच 65000 करोड गुंतवणुकीतून केरळ मध्ये 1100 किमी राष्ट्रीय राजमार्ग निर्माण कार्य चालू राहणार.
३३. शेतकऱ्यांना उत्पादन कराच्या दीडपट MSP दिला जाणारा, 2013 14 मधील गहू उत्पादक शेतकऱ्यांना 33 हजार 874 कोटी ,तर 2019 मध्ये 52 हजार 802 कोटी , 2021 मध्ये 75हजार 60 कोटींची तरतूद करण्यात आली.
३४. पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या स्वामित्व योजने अंतर्गत गावातील संपत्तीच्या मालकांना अधिकाराचे कागदपत्र दीले जाणार , आत्तापर्यंत 1241 गावात 1.80 लाख मालमत्ता मालकांना कार्ड प्राप्त झाल्याचा दावा.
३५. शिक्षणासाठी मोठ्या घोषणा , विद्यार्थीना अद्ययावत सुविधांचा लाभ , 100 सैनिकी शाळा देशभरात उघडल्या जाणार, हायर एज्युकेशन कमीशनची लवकरच स्थापना केली जाणार. १५००० शाळेना पुन्हा मजबूत केले जाणार.
३६. एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देशात कुठेही धान्य मिळणार, 32 राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशांमध्ये योजना सुरु करण्यात आली.
३७. लेंडींग पोर्टफोलिओ तीन वर्षासाठी 5 लाख कोटी कायम राहणार.
३८. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी 64 हजार कोटीची तरतूद केली जाणार.
३९. असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल उभे केले जाणार.
४०. स्वच्छ भारत 2.0ची घोषणा केली.
४१. मालमत्तेची कागदपत्रे डिजिटल होणार असल्याची माहिती दिली.
४२. PSLV CS 51 launch केले जाणार , गगणयान मिशनचे पहिले मानव रहित लाँच डिसेंबर 2021 मध्ये केले जाणार असल्याची माहिती.
४३. वित्तीय तूट 2020 2021 मध्ये जिडिपीच्या 9.5% असल्याची माहिती.
४४. समुद्र संशोधन करण्यासाठी 4 हजार कोटीची घोषणा करण्यात आली.
४५.१६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट मांडण्यात आले.
४६. 2021 मध्ये वित्तीय तूट जिडिपीच्या 6.8% करण्याचं उद्दिष्ट सांगण्यात आले.तसेच 2023 24 पर्यंत जिडीपी तूट 3 टक्क्यांपर्यंत आणण्याची अपेक्षा केली.
४७. लघु उद्योगांसाठी 15 हजार 700 कोटीची तरतूद करण्यात आली.
४८. देशाची पुढील जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याची माहिती दिली.
४९. भारताचा अकस्मात निघी 500 कोटी वरून 30 हजार कोटी करण्यात आला
५०. 75+ वृद्धांसाठी टॅक्स रिटर्न्सची गरज लागणार नाही.
५१. बुडालेल्या कर्जासाठी management company तयार करण्याची घोषणा केली.
५२. सरकारला 80 हजार कोटींच्या निधीची गरज असल्याचे सांगण्यात आले , त्या दृष्टीने निधी जमा करण्यासाठी योजना केली आहे.
५३. पेन्शन धारक नागरिकांना आयकरमधून सुट देण्याचा प्रस्ताव मांडला.
५४. डिजिटल transactions साठी अजून सुट देण्यात येणार.
५५. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी.
५६. टॅक्स मधून सूटसाठी झिरो कूपन बॉण्ड लाँच केला जाण्याची माहिती दिली.
५७. NIR साठी टॅक्स नियाममध्ये बदल होणार असल्याचे संकेत.
५८. टॅक्स ऑडिटची मर्यादा 5 कोटिंवरून 10 कोटींवर करण्यात आली.
५९. स्टार्टअपसाठी 31 मार्च 2022 पर्यंत टॅक्स लागणार नाही.
६०. आदिवासी भागात एकलव्य स्कूल उघडले जाणार.
६१. स्वस्त घर योजनेसाठी 1.5 लाखांच्या व्याजावर जुलै 2019 मध्ये करमुक्तीची घोषणा करण्यात आली, योजने अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज सवलतीत वाढ करण्यात आली.
६२. मोबाईल पोर्ट वरील उत्पादन शुल्क रद्द. मोबाईल आणि मोबाईल चार्जर महाग होणार.
६३.सोन्या चांदीवरील सीमाशुल्कावर पुनर्विचार होणार. सोने आणि चांदीच्या दरात घट होण्याची शक्यता.
६४. जुन्या कर प्रकरणातील तपासासाठी 6 ऐवजी 3 वर्षाचे रेकॉर्ड तपासणार असल्याची माहिती.
६५. ऑक्टोंबर महिन्यापासून नवी कस्टम डुटी लागणार असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती.
६६. टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे सांगितले.
६७. पेट्रोल आणि डिझेलवर कृषि अधिभार लागणार. पेट्रोलवर 2.5 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर चार रुपये प्रति लिटर कृषि अधिभार द्यावा लागणार.