"अबोल राहून खूप काही बोलताना 
 तिच्याकडे फक्त बघतच रहावं !!
 तिच्या प्रत्येक नखऱ्याला 
 डोळ्यात फक्त साठवून घ्यावं !!

 नसावी कसली भीती तिला 
 तिच्यासारखं आपणही बिंधास्त रहावं !!
 अल्लड प्रेमाची भावना समजून घेताना 
 उगाच आपणही हरवून जावं !!

 ओढ असावी ही मनात तिच्या 
 तिने ते नजरेत बोलून दाखवावं !!
 मी मात्र उगाच शोधताना 
 मनात माझ्या तिला पहावं !!

 असे हे नाते मनाचे 
 नेहमीच नव्याने तिने फुलवाव !!
 कधी हसू कधी रडु 
 पण सतत माझ्या सोबत रहाव !!

 कितीदा भेटाव तिला
  तरी पुन्हा पुन्हा त्या वाटेवर जावं !!
 तिच्या येण्याकडे तेव्हा 
 नजर लावून पहात रहावं…!!" 
 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE