"कधी कधी वाटतं अबोल होऊन रहावं तुझ्याकडे पहात नुसत तुझ बोलन ऐकावं पापण्यांची उघडझाप न करता एकटक तुझ्याकडे पहावं आणि तुझ्या बरोबर सतत राहुन फक्त तुझाच होऊन जावं!! कधी कधी वाटतं तुझं आवडीचं गाणं लागावं तुही त्या सोबत मनसोक्त म्हणावं माझ्या जवळ येऊन उगाच मला मिठीत घ्यावं त्या गाण्यात सुर मिसळून मलाच घेऊन नाचावं!! कधी कधी वाटतं सगळं काही विसरु जावं तुझ्या सवे असताना तुझ मन वाचावं मनातल्या कोपर्यात कुठेतरी स्वतःलाच कोरावं आणि कोरलेलं ते नाव माझं कायमच तिथेच रहावं…!!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
