"वहीचं मागच पान, तुझ्या नावानेच भरलं!! कधी ह्रदय कधी क्षण, कुठे कुठे कोरलं!! मन मात्र हरवुन, सांगायलाच विसरलं!! डोळ्यातलं ते प्रेम, तुलाच नाही कळलं!! कधी साद ह्दयाची, सांग हे सगळं!! ओठांवरचे शब्द जे, मनातच विरलं!! हे अबोल प्रेम अखेर, वहीतच राहिलं!! नावाने भरलं तुझ्या, पण अधुरचं राहिलं!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*