"न कळावे तुला कधी!!
 शब्दांन मधील भाव सखे!!
 मन ओतले त्यातुन तरी
 अबोल तुझ न प्रेम दिसे!!

 मी लिहावे किती सांग तरी
 प्रेम हे का शुन्य असे!!
 एक ओढ मझ भेटण्याची
 मनी तुझ्या का आज दिसे!!
 
 शब्द झाले अधीर हे
 शोधते का तुला असे!!
 सोड तो अबोला आता
 अश्रुन मधुनी आज दिसे!!
 
 पुन्हा परतावे क्षण
 जगण्यास ते आज सखे!!
 वाट पहाते मन तरी
 अबोल तुझ न प्रेम दिसे!!"
 :योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE