अनोळखी नाते..|| NATE PREMACHE || KAVITA ||

Share This
"नकोच आता भार आठवांचा
 नकोच ती अधुरी नाती!!
 नकोच ती सावली आपुल्यांची
 नकोच त्या अधुऱ्या भेटी!!

 बरेच उरले हातात त्या
 रिक्त राहिली तरीही नाती!!
 डोळ्यातल्या आसवांना विचारे
 वेदनेची गोष्ट ती कोणती!!

 ताणले तरी सुटे न आता
 थांबले तरी का क्षणासाठी!!
 परतून येता इथे असे मग
 भेटले सारेच का अनोळखी!!

 कसे नाते शोधावे इथे आज
 साऱ्याच नव्या गोष्टी!!
 शोधले तरी भेटले न आपुले
 जुन्या चेहऱ्यास व्यर्थ शोधती!!

 पुन्हा नव्याने भेटली का ती
 दोन अनोळखी नाती!!
 न त्यास नीट समजली
 न त्याने जाणून घेतली!!

 निर्थक सारे मनात असता
 कशी जपणार मग ती नाती!!
 या शब्दास न कळेच काही
 बोलण्यास उरलेच न इथे बाकी!!

 नात्यात हवी आपुलकी जरा
 नात्यास हवी माणुसकी!!
 नात्यात असावा विश्वास तेव्हा
 नात्यास भेट व्हावी आपुली!!

 कडव्या मनात न भेटते कोणी
 जुन्या दुःखात न होते सोबती !!
 नव्याने भेटली ती जुनी नाती
 मग तरी ही का होती अनोळखी!!

 म्हणून, मन बोलते,
 नकोच आता भार आठवांचा!!
 नकोच ती अधुरी नाती
 नकोच ती सावली आपूल्यांची!!

 नकोच त्या अधुऱ्या भेटी ..!!"

 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

घरटे || GHARATE || AAICHE PREM ||

Mon Jan 14 , 2019
वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची उजाड वाटे घरटे तुझे मग सलगी कर तू स्वतःशी गडबड आणि गोंधळ कसला विचार तुझ्या मनाशी