Contents
"नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती!! नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी!! बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती!! डोळ्यातल्या आसवांना विचारे वेदनेची गोष्ट ती कोणती!! ताणले तरी सुटे न आता थांबले तरी का क्षणासाठी!! परतून येता इथे असे मग भेटले सारेच का अनोळखी!! कसे नाते शोधावे इथे आज साऱ्याच नव्या गोष्टी!! शोधले तरी भेटले न आपुले जुन्या चेहऱ्यास व्यर्थ शोधती!! पुन्हा नव्याने भेटली का ती दोन अनोळखी नाती!! न त्यास नीट समजली न त्याने जाणून घेतली!! निर्थक सारे मनात असता कशी जपणार मग ती नाती!! या शब्दास न कळेच काही बोलण्यास उरलेच न इथे बाकी!! नात्यात हवी आपुलकी जरा नात्यास हवी माणुसकी!! नात्यात असावा विश्वास तेव्हा नात्यास भेट व्हावी आपुली!! कडव्या मनात न भेटते कोणी जुन्या दुःखात न होते सोबती !! नव्याने भेटली ती जुनी नाती मग तरी ही का होती अनोळखी!! म्हणून, मन बोलते, नकोच आता भार आठवांचा!! नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपूल्यांची!! नकोच त्या अधुऱ्या भेटी ..!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreआठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read Moreचांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!
चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !!
लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…
Read More“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसराय…
Read Moreआशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला !!…
Read Moreसाद कोणती या मनास आज
चाहूल ती कोणती आहे!!
तुझ्या आठवांचा पाऊस आज
मज चिंब का भिजवत आहे??…
Read More