“तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस , अनोळखी नजरेस ओळखू शकलो नाही!!” मंदार प्रियाच्या नजरेत नजर रोखुन सगळं बोलतं होता. प्रिया फक्त त्याच्याकडे पहातं होती. तिची ती शांतता त्याला नकोशी वाटतं होती.
‘सांग ना मला प्रिया!! हवं तरं भांड माझ्याशी, पण हा अबोला नको!! ती अनोळखी नजर तुझी, मला पाहुन न पाहिल्या सारखे करणे खरंच असह्य होतंय मला!! त्याच्या बोलण्यातुन त्याच तिच्यावरच प्रेम शब्दांतुन जाणवंत होतं. त्या भेटीत त्याला खुप काही बोलायचंय तिच्या मनातल्या रागास कुठेतरी संपवायचंय हे तिला कळत होतं. मनात मात्र प्रिया खुप काही बोलतं होती आपल्या कित्येक भावना ती सांगत होती तिच्या मनातल्या भिंती त्या सर्व ऐकत होत्या पण मंदारच्या मनात त्या ऐकु जातं नव्हत्या.
” खुप काही सांगायचय रे मला पण कस सांगु ज्यावेळी खरंच मला तुझी गरज होती त्यावेळी तु कुठे होतास हे कस मी सांगु. नातं हे अस नसतं रे तुझ्या मनात येईल तेव्हा तु चिडायचं वाटेल तेव्हा निघून जायचं आणि पुन्हा माझी आठवण येताच मला मनवायचं असं किती रे दिवस हे चालणार!!” मनात सार प्रिया हे बोलत होती पण ओठांवर ते काहीच येऊ देतं नव्हती. कारण तिला मंदारला दुखवायचं नव्हतं.
मंदारची चिडचीड पाहुन तिलाही दुखः वाटतं होतं पण हळव्या या मनास तिला कुठेतरी कठोर करायचं होतं. मंदारच हे वागणं आता असह्य झालं होतं. प्रिया त्याच्या प्रेमासाठी त्याला काहीच बोलतं नव्हती. पण अखेर तिने ही मंदारला मनातल सगळं सांगितलं. तिचा तो अबोला संपताचं ती बोलली.
“मंदार माझं न बोलणं, तुझ्याकडे पाहुनही न पाहिल्या सारखे करणे यांचा तुला त्रास होतो ना? मग अस तुही माझ्याशी वागताना माझ्या मनाचा विचार केलायस कधी? छोट्या भांडणातही तु माझ्याशी कित्येक दिवस बोललाच नाहीस ज्यावेळी आलास त्यावेळी तुला कोणीतरी बोललं म्हणुन तुला माझी आठवण आली ! खरं ना?? म्हणजे माझं स्थान तुझ्या आयुष्यात कुठे आहे हेच मला कळत नाहीये. तुला वाटेल त्यावेळी तु नातं जोडतोस आणि पुन्हा गरज संपताच ते तोडुन टाकतोस त्यावेळी नात्यांची किंमत तुला कधी कळतच नाही रे.!!”
“प्रिया, खरंच माझं चुकलं मला माफ करं !!” मंदारच्या डोळ्यात पाणी आले होते.
“नाही मंदार प्रत्येक वेळी सगळं झाल्यावर माफी मागण्यात काय अर्थ असतो सांग ना? कित्येक वेळा हा मनास दुखवायचा आणि पुन्हा काही झालेच नाही असे म्हणुन माफी मागण्याचा खेळ चालणार? मला आता याविषयी काहीच बोलायच नाही आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही असं मी ठरवलंय! !”
प्रियाच्या या निर्णयाचा मंदारला चांगलाच धक्का बसला त्याला काय बोलावे तेच कळेना. माफी तरी काय म्हणुन मागावी. आणि त्याचा आता काही अर्थ ही नव्हता. अखेर प्रिया जाण्यास निघाली मंदारने खुप तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण वेळ आता निघुन गेली होती. होतं त्यावेळी नातं जपता आलं नाही आणि आता ते दुर जाताना मंदारला त्याचा त्रास होत होता.
“माझं खरंच चुकलं मला करं !!”
मंदारचे हे शब्द प्रियाच्या मनापर्यंत पोहचलेच नाहीत आणि पोहचतील ही कसे मंदारनेच ते मन दुखाच्या वेदनेने घायाळ केले होते तिथे त्याचे शब्द ऐकायलाही ते मन आता तयार नव्हते पुन्हा नव्याने सुरू करण्यास तिचे मन आता तयार नव्हते.
कित्येक वेळ मंदार ती निघुन गेल्यावर तिथेच बसुन होता. हरवलेल्या नात्यास कुठेतरी शोधत होता. “प्रिया, नकोस जाऊ तु मला सोडुन!!” आठवणींना तो सांगत होता. आणि हरवुन गेलेल्या पाखरास उगाच एकटाच शोधत होता.
समाप्त
-योगेश खजानदार
READ MORE
सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्…
Read More१. ब्रिटीश कमुनिस्ट वृत्तपत्र “डेली वर्कर” वर बंदी घातली. (१९४१)
२. मेघालय आणि मणिपूर यांना राज्याचा…
Read More१. ब्रिटीश सैन्याने इस्मालियावर ताबा मिळवला. (१९५२)
२. बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या ४४व्या राष्ट्राध…
Read More१. प्रसिध्द लेखक एम. टी. वासुदेवन यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. (१९९६)
२. पुणे महानगरपालिकेची …
Read Moreजन्म
१. आदेश बांदेकर, मराठी चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९६६)२. विनोद कांबळी, भारतीय क्रिकेटपटू…
Read More“चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !!
प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !!
कुठे बेफाम हस…
Read More१. अँड्र्यू स्मिथ यांनी पहिल्या केबल कारचे पेटंट केले. (१८७१)
२. नेदरलँड आणि इंडोनेशिया या देशांनी स…
Read More१. मोरारजी देसाई यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे उद्घाटन केले. (१९५५)
२. छत्रपती …
Read More१. पानिपतचे ३ रे युद्ध संपले. (१७६१)
२. एलीशा जी ओटीसने सुरक्षित उद्वाहकाचे (लिफ्ट) जगातले पहिले पेट…
Read More१. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना झाली. (१९६०)
२. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गाँधी शांत…
Read More१. गॅलिलिओ यांनी गुरू ग्रहाचा कॉलिस्टो नावाचा चौथा उपग्रह शोधला. (१६१०)
२. अमेरिका आणि मॅक्सिकॉ मध्य…
Read More१. हॉलंड या देशाने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१५८३)
२. किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी आणि कुर्बान …
Read More१. पाकिस्तान पासून वेगळे झालेल्या देशाचे बांगलादेश असे नाव ठेवण्यात आले. (१९७२)
२. युरेनस ग्रहाच्या …
Read More१. डच वसाहतवादी केपटाऊन येथे ब्रिटिशांना शरण गेले. (१८०६)
२. भारतातून पहिल्यांदाच चहा हे पेय लंडनला …
Read More१. रशिया आणि तुर्की यांनी शांततेच्या करारावर स्वाक्षरी केली. (१७९२)
२. अलाहाबाद येथे नव्या सहस्त्रका…
Read More१. पहिले टेलिफोन कनेक्शन नेदरलँड ते वेस्ट इंडिज मध्ये करण्यात आले.(१९२९)
२. USSR चे लूना २१ नावाचे च…
Read Moreडोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची??
एकटेच चालत रहावे!…
Read More१. गॅलिलिओने पहिल्यांदाच गुरू या ग्रहाच्या तीन चंद्रांचा शोध लावला.( १६१०)
२. कोलकाता मध्ये “इंडियन …
Read More१. “दर्पण” साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरू केले…
Read More१. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) ची पुण्यात सुरूवात झाली. (१९४९)
२. फॉक्स स्टुडीओने आपली मूव्ही …
Read More१. ” केसरी” या वृत्त पत्राची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. (१८८१)
२. चारचाकी रोलर स्केटिंग याचे …
Read Moreजन्म
१. जसवंत सिंह , राजकीय नेते, केंद्रिय मंत्री. (१९३८)२. पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या, समा…
Read More१. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.(१९५४)
२. “मराठा” या नियतकालिके…
Read Moreक्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read More१. इंडियन पिनल कोडची सुरुवात झाली. (१८६२)
२. पुणे येथे नूतन मराठी या शाळेची स्थापना झाली (१८८३)
३. प…
Read More१. थॉमस अल्वा एडिसन याने विद्युत दिव्याचे प्रात्यक्षिक न्यू जर्सी येथे केले. (१८७९)
२. जेम्स ब्रेडले…
Read More१. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा पोर्ट ब्लेअर येथे फडकवला. (१९४३)
२. ढाका येथे मु…
Read More१. लॉरेल आणि हार्डी यांचा “sons of the desert” नावाचा विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला. (१९३३)
२. मॅकें…
Read More१. भारतीय national congress party ची स्थापना झाली. (१८८५)
२. दक्षिण इटली येथे आलेल्या भूकंपात आणि स्…
Read More१. नेदरलँडपासून इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४९)
२. बेनेझिर भुट्टो यांची गोळ्या घालून हत्या क…
Read More